अहमदनगर - नगर तालुक्यातील मौजे देहरे येथे आज दि.०१ जून रोजी वडार समाजातील सुमारे १५४ गरजू महिला मजूरांना श्री गुरूदत्त सेवा भावी संस्था,देहरे या संस्थेच्या वतीने साखर,चहा पावडर,मिठपुडा ,तांदूळ,कोलगेट पेस्ट,दोन प्रकारचे साबण इ.जीवनाश्यक वस्तु संस्थेचे अध्यक्ष रमेश जेठे व सचिव सागर धनवटे यांच्या शुभहस्ते अतिशय काळजीपुर्वक नियोजन करून,मास्कचा वापर, सामाजिक अंतर ठेऊन वाटण्यात आले.
सध्या जगभरातून देशासह राज्यात कोरोना या वैश्विक महामारीने थैमान घातले आहे.त्यामुळे लाॅकडाऊन जरी शिथील झाले असले तरी अनेक मजूरांना हाताला काम नाही,त्यामुळे मजूरी काम करणार्यांना पैशाची चणचण भासत आहे.काहि मजूरांची मोठ्या प्रमाणावर उपासमार होत आहे. या सर्व गोष्टींचा विचार करुन समाजाप्रती आपण काहितरी देणे लागतो, आपणही या संकटाच्या काळात समाजातील खर्या गरजूंना मदतीचा हात दिला पाहिजे या उदात्त हेतूने देहरे येथील श्री गुरूदत्त सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष रमेश जेठे व सचिव सागर धनवटे यांनी सदर मजूरांच्या हालाखिची योग्य वेळी दखल घेऊन धान्याचे किट वाटुन आपले कर्तव्य निभावले आहे.या कोरोना पार्श्वभुमीवर गरिब गरजूंना यामुळे दिलासा मिळाला आहे.
संस्थेचे अध्यक्ष रमेश जेठे यांचे महाराष्ट्रभर सामाजिक योगदान असून त्यांनी महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना मार्गदर्शन करून सुमारे ६५०० बांधकाम कामगारांची नोंदणी करून दिले आहे. अनेक मजूरांना रेशन कार्ड, घरकुल,संजय निराधार योजनेचे लाभार्थी होण्यासाठी गरिबांना मदत, कोरोनात लाॅकडाऊनमध्ये सापडलेल्यांना धान्य किट मिळण्यासाठी शासनाकडे व खाजगी संस्थाकडे व अडकलेल्या मजूरांना घरी पोहोचण्यासाठी शासन प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा त्यांनी केला आहे.
रमेश जेठे हे गोर गरिबांना सातत्याने मदत करणारे म्हणून महाराष्ट्रभर परिचित असून त्यांच्या या सामाजिक कार्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे. सदर कार्यक्रम यशस्वी होणे साठी वडार समाज संघाचे प्रदेशाध्यक्ष राकेश विटकर, लक्ष्मण बामणे,रामचंद्र मंजूळे,विठ्ठल माने,अशोक पाटील, रामदास धनवटे सर,तुकाराम धनवटे सर,जगन्नाथ धनवटे, विशाल जेठे, निरज जेठे, विशाल कुसळकर,अनिकेत धनवटे आदींनी सहकार्य केले.