नमस्कार 🙏
मी दिग्दर्शक -: कैलाश मेधाणे
16 सप्टेंबर ला
"कळले नाते खरे"
हे आमचे गीत झी मुझीक कंपनीला रिलीज होत आहे. यामध्ये मुख्य भुमिकेत निकिता पिंगळ व किशोर शिंदे हे आहेत. या गाण्याचे लेखण गायण व संगीत वसंत हंडीबाग यानी केले. आहे तसेच या गाण्याचे प्रोडूसर -: वंसत हंडीबाग हे आहेत. या गाण्याचे
सिनेमेटोग्राफर -: विनायक जंगम हे आहेत.
मेकपआर्टिष्ट-: संदीप रायकर
आर्ट दिग्दर्शक -: गजानन तांबे
पोस्ट प्रोडक्शन -: द ऑसम स्टुडीओ प्रोडक्शन टीम -: रितीक कोस्टी आदित्य जंगम यांनी सांभाळले आहे. 16 सप्टेंबर ला Zee Music मराठी कंपनीला हे गीत रिलीज होत आहे. या गाण्याचे दिग्दर्शक -: कैलाश मेधाणे यांनी आत्तापर्यंत चित्रपट सृष्टित अनेक मराठी हिंदी सुपहीट गीत केले आहेत. कोरोणाच्या काळात त्याचे सर्वात सुपरहीट झालेले गीत "जा लढवाया तु मावळ्या" हे गीत अख्या महाराष्ट्रात सुपरहीट झाले होते. हे गीत T Series या कंपनीने रिलीज केले होते. तसेच हे गीत अनेक न्युज चॅनेल नी आपल्या माध्यमातून दाखवले होते. तसेच कित्येक न्युज पेपर मधुन या गीत बद्दल च्या बातम्या छपून आले होते. संपूर्ण महाराष्ट्रात या गीताचे कौतुक केले जात होते. तसेच त्यांचे "फक्त तु" हे गीत सुध्दा आपल्या झी म्युझीक कंपनीने रिलिज कले आहे. ( पंढरीच्या दारी गर्जला मृंदुंग, गण गण गणात बोते, बाप्पा मोरया रे, महादेव पार्वतिचा गणपती, गणनायक सिद्धी विनायक ) असे अनेक गीत सुमीत म्युझीक, कुनाल म्युझीक या कंपन्यांनी रिलीज केले आहेत. 9X झकास, संगीत मराठी, मायबोली या सारख्या अनेक TVचॅनेलला सुपहीट झाले आहेत. दिग्दर्शक कैलाश मेधाणे हे मुळचे नाशिक चे त्यांना लहान पणापासुनच फिल्म लाईन ची आवड होती. त्यांना अॅक्टर व्हायचे होते. पण घरची परिस्थिती बेताची असल्या मुळे त्यांना ते शक्य नव्हते.कधी काही कामा निमित्त नाशिक च्या शहरात गेला तर तिथल्या नाशिक च्या शिनेमा कलाकारांच्या कट्यावर त्याची नजर जायची तिथे असलेल्या भिंतिंवर चिकटवलेल्या सिनेमाच्या पोस्टरवर नजर पडायची.स्वतःला पण वाटायचे ,विचार मनात यायचा की आपलंही एखादा भला मोठा शिनेमा चा पोस्टर आपल्या नावासोबत झळकला पाहीजे .कधी असंहोईल का हा मनात विचार करुन हरवुन जायचा कैलाश त्यात घरची परिस्थीती हलाखीची वडील शेतीत दिवस राञ राबत ,त्यात त्याला कलेनं झपाटलेलं एक अत्यंत गरीब घरातला मुलगा .शिक्षण जेमतेम करुन बसलेला. आपले शिक्षण पुर्ण करून महींद्रा अँन्ड महींद्रा कंपनी नाशिक मधे जॉब लागला त्यानंतर पण त्यांनी तो सोडून दिला. व त्यानंतर त्यांनी स्वताचे फॅब्रीकेशन वर्कशॉप टाकले. त्यांनी तेही सोडले त्यानंतर त्यांनी घरी आई वडीलांसोबत शेती केली. पण त्यांना त्यात काही मन रमत नव्हते.म्हणुन घरच्यांनी सगळे त्याच्यावरच सोडुन दिले.वडीलांचा विश्वास होता.हा एक दिवस करेल काही तरी मोठं नाव आपला मुलगा जगावेगळा आहे.शेतीच्या कामात रक्त आटवत संसाराचा गाडा हाकणार्या एका गरिब कष्टकर्याचा मुलगा आहे.एक दिवस मोठा रुपेरी पडदा व्यापुन टाकायचं स्वप्न ठरवलं होतं. स्वप्नांना सत्याच्या दिशेने उतरवायचे प्रयत्न या ध्येयवेड्याने सुरु केले. म्हणुन अखेर त्यांनी नाशिक सोडुन मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. आणी मुंबई गाठली मुंबईच्या माया नगरीत येऊन एक चांगला दिग्दर्शक होऊनच घरी जायचं स्वप्न उराशी बाळगुन आला होता.घरची परीस्थीती बेताची असल्या मुळे पुरेसे पैसेही जवळ नव्हते.रहायला जागा नाही कोनी ओळखीचे नव्हते. जिकडे मिळेल ते काम करत राहिला. हळू हळू मिळेल ते काम करत फिल्म लाईन मध्ये काही नवीन मिञ तयार झाले. त्यात एक पुण्याचा मिञ तो पण असेच घर सोडुन मुंबईत राहुन फिल्म लाईन मध्ये मेकअपआर्टिष्ट नावारुपाला आलेला सुजित सुरवसे,तसेच अभिनेता अमोल पाटील या मिञांच्या मदतीने काम मिळायला लागले. त्यात. मराठी मालिका , हिन्दी मालिका , चित्रपट मध्ये काम मिळायला लागले. पण कधी काम मिळायचे तर कधी नाही घरची परीस्थिती बेताची असल्यामुळे घरूनही पैसे मागु शकत नव्हते. त्यामुळे आता कारायचे तरी काय हा मोठा प्रश्न होता त्यातच त्यानी दिग्दर्शक होण्याचा निर्णय घेतला मग दिग्दर्शक असिस्टंट म्हणून त्यांना काम मिळु लागले. मग दिग्दर्शक असिस्टंट चे काम करत ते एक चांगले मराठी चिञपट सृष्टितले चांगले दिग्दर्शक म्हणून नावारुपाला आले. खरे तर घरची परिस्थिती बेताची असतानाही इतके मोठे स्वप्न बघण आणि ते यशस्वी करून दाखणे हे त्यांच्या कडुन शिकावे. कैलाश मेधाणे हे एक खुप हुशार मनमिळाऊ असे व्यक्तिमत्व आहेत.लवकरच त्यांचे आपल्याला मराठी चिञपट सुध्दा बघायला मिळतील.काही चिञपटांवर लवकरच त्यांच काम चालु आहे.येणार्या भविष्यात कैलाश मेधाणे हे नाव एक चांगला दिग्दर्शक चांगले व्यक्तिमत्व म्हणुन आपल्या सर्वांच्या मनात घर करुन जाईल यात काही शंकाच नाही . धन्यवाद आपलाच दिग्दर्शक-: कैलाश मेधाणे 🙏