👉 अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापिठाच्या साई कृपा महाविद्यालयात अंतिम वर्षात शिकणाऱ्या तेजल उत्तमराव कोहाकडे हिने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत यशाला गवसणी घातली आहे.
👉 तेजल कोहाकडे हिने शेतकरी बांधवांसाठी कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत शेतीसाठी अनुकुलित असणाऱ्या साधनांवर प्रात्यक्षिके सादर करीत एक आदर्श कन्या म्हणून नावलौकिक मिळवला आहे.
👉 यामध्ये तिने आधुनिक शेतीसाठी मोबाईल अँपचा वापर कसा करावा, तसेच एकात्मिक तण नियंत्रण, खते वापरण्याची पद्धत, बीज प्रक्रिया व त्याच्या पद्धतीबद्दल योग्य मार्गदर्शन केले.
👉 त्याचबरोबर दुधापासून वेगवेगळे पदार्थ कसे बनवावे, बीज उगवण, त्याची क्षमता चाचणी याविषयी प्रत्यक्ष प्रात्यक्षिके दाखवून माहिती दिली.
👉 यासाठी तिला कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के एच. निंबाळकर, कार्यक्रम समान्वय प्रा.जाधव, कार्यक्रम अधिकारी प्रा.एस.एम. लोंढे व इतर प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.