भारतातील प्रसिद्ध सिंगर, गीतकार, असंख्य तरुणांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा गायक गुरु रंधवा यांचा आज (30 ऑगस्ट) जन्मदिवस. आज आपण त्यांच्याविषयी काही खास माहिती जाणून घेऊयात.
सध्या गुरु रंधवा हा चर्चेत असलेला गायक असून तो आता फक्त पंजाबी गाण्यांपूरता मर्यादित राहिलेला नाही, तर बॉलिवूडमध्ये देखील आपल्या शैलीत गाणी म्हणून त्यांनी जगभरासह देशभरात असंख्य चाहते निर्माण केले आहेत.
गायक गुरु रंधवा यांनी एक रेकॉर्ड बनवला असून 'टी-सीरीज'च्या युट्यूब चॅनेलवर गायक गुरु रंधवा यांच्या गाण्याला असंख्य लोकांनी पाहिलं आहे. यूट्यूबवर सर्वाधिक व्यूज असणारे ते पहिले भारतीय गायक बनले आहेत.
🎤 गुरु रंधवा यांची सुपरहिट गाणी :
▪️ 'सूट सूट'...https://bit.ly/3juVbfn
▪️ 'हाई रेटेड गबरू'..https://bit.ly/2YLr0su
▪️ 'लाहौर'..https://bit.ly/2Qy8jE3
▪️ 'बन जा तू मेरी रानी'..https://bit.ly/3jlrq0c
गुरु रंधवा यांनी अनेक चाहत्यांचं मन जिंकलं असून दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल अवॉर्ड (2019) या पुरस्काराचे ते मानकरी ठरलेले आहेत.