प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी:-                                  केज शहरात नमिता मुंदडा यांचा सलग तीन दिवस झंझावाती प्रचार दौरा चालू आहे.शहरातील व्यापारी बांधव तसेच सर्व सामान्य लोकांना भेटीगाठी घेऊन दिपावलीच्या शुभेच्छा देऊन आपण केलेल्या विकासकामांची माहिती देऊन मतदान रुपी आशीर्वाद केज मतदारसंघाच्या भाजप महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ.नमिता मुंदडा मागत आहेत. व त्यांना भरघोस प्रतिसाद मिळत आहे.विषेश म्हणजे नमिता मुंदडा या विरोधी उमेदवारांवर कोणतिही व्यक्तीगत टिका न करता आपण केलेल्या विकासकामांबद्दल माहिती देऊन मतदान मागत असल्याने सद्या केज शहरातील वातावरण नमिता मुंदडामय झाले आहे.                 ‌‌                            
  
शिक्षक कालनी भागामध्ये प्रकाश मुंडे यांच्या प्रांगणात आयोजित केलेल्या भेटीत महिला भगिनी, युवक तसेच नागरीक यांची मोठी उपस्थिती होती.यावेळी बोलताना या भागात लवकरच पाण्याची टाकी व पाइपलाइन करून तसेच उद्यान व सभागृह करून या भागातील लोकांना  येत असणाऱ्या अडचणी सोडवल्या जातील असे आश्वासन सौ.नमिता मुंदडा यांनी दिले.यावेळी पुढे बोलताना त्यांनी सांगितले की लोकनेते गोपीनाथ रावजी मुंडे सभागृहाचे काम अतिशय दर्जेदार केले जात असून यामुळे केज शहराच्या वैभवात मोठा भर पडणार आहे .

यावेळी शिक्षक कालनी भागातील महिला युवक व नागरिकांनी आम्ही तुमच्या बाजूने भरघोस मतदान करू असे नमिता मुंदडा यांना अस्वस्थ केले.
header ads