प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी :- केज मतदारसंघातून भाजप महायुतीच्या उमेदवार सौ.नमिता मुंदडा यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेऊन केज मतदारसंघ पिंजून काढला आहे. नमिता मुंदडा यांच्या झंझावाती प्रचार दौऱ्यामुळे केज मतदारसंघात *ओन्ली नमिता* मय वातावरण निर्माण झाले आहे.
केज मतदार संघ प्रगतीच्या शिखरावर पुढे नेण्यासाठी अजूनही जास्तीत जास्त प्रयत्न केले जातील तसेच या पुढील काळात केज शहरातील पाणीपुरवठा योजना ज्या भागात पोहोचली नाही तिथे पोहोचवली जाईल व केज शहरातील पाण्याचा प्रश्न कायमचा मिटवला जाईल असे आश्वासन नमिता मुंडे यांनी केज शहरात आयोजित विविध बैठकीत नागरिकांना तसेच महिलांना दिले आहे.
मराठा ,वंजारी, धनगर, लिंगायत ,माळी ,दलित ,मुस्लिम ,ब्राह्मण, मारवाडी , चांभार व इतर जातीमध्ये नमिता मुंदडा यांची क्रेझ निर्माण झाले असल्याने नमिता मुंदडा यांना केज मतदारसंघाची निवडणूक सोपी झाली आहे अशी केज मतदारसंघातील जनसामान्यात जोरदार चर्चा चालू आहे.
नमिता मुंदडा म्हणजे अथक परिश्रम , अविचल, संवेदनशील ,अभ्यासू ,कार्यतत्पर समतावादी ,ऊर्जावान न्यायानिष्ठ व्यक्तिमत्व केज मतदार संघाला लाभले आहे.
येणाऱ्या काळात केज मतदार संघाचा पहिल्यापेक्षा जास्त भरीवविकास करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत असे भाजपा महायुतीच्या उमेदवार सौ. नमिता अक्षय मुंदडा यांनी केज मतदारसंघात आयोजित विविध बैठकीत बोलताना सांगितले.